कार्यालय वेळ: 10:00 am - 05:00 pm

Chhatrapati Shivaji Maharaj
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj
Savitribai Phule
महाराष्ट्र शासन
ग्रामपंचायत पळसा
अधिकृत संकेतस्थळ
Mohandas Karamchand Gandhi
Dr. Babasaheb Ambedkar
Swami Vivekananda

जोतिर्लिंग मंदिर

jyotirling

गावाच्या मध्यभागी ग्रामदैवत ज्योतिर्लिंगाचे मंदिर असून त्यामध्ये असणारी महादेवाची  स्वयंभू पिंड याबद्दल आख्यायिका सांगितली जाते ती अशी सोनवडे गावच्या पश्चिमेला पालख्याचं टेक म्हणून ओळखत असणाऱ्या टेकडीवर गवळी लोकांची वस्ती होती.पशुपालनाचा प्रमुख व्यवसाय असणारे हे गवळी लोक गाई पाळत होते. दिवसभर गाईंना जंगलात चरायला सोडत.त्यातील एक गाय मात्र दिवसभर चरून आल्यानंतर दूध देत नसे.असे सलग काही दिवस त्या गाईने दिवसभर चरून आल्यानंतर दूध दिले नसल्यामुळे एक दिवस गवळी गाईला चरायला सोडल्यानंतर गाईच्या पाठोपाठ जातो व पाहतो तर काय ती गाय स्वयंभू महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार सोडत आहे. त्यानंतर त्या ठिकाणी हळूहळू लोक राहण्यासाठी आले.

जोतिर्लिंग मंदिर

स्वयंभू पिंड आहे त्या ठिकाणी मंदिराची उभारणी करून पूजा अर्चा करू लागले. तेच आत्ताचे सोनवडे गाव.  अगोदर त्या ठिकाणी कौलारू उतरत्या छपराचे मंदिर होते. परंतु त्या जुन्या मंदिराच्या जागेवर २०१६ साली सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला व मंदिराचे संपूर्ण रूप पालटले. मंदिरामध्ये सुंदर  अशी विद्युत रोषणाई केली आहे. मात्र जीर्णोद्धार करताना आजही स्वयंभू पिंड आहे तिथेच आहे.पूर्वीची असणारी महादेव, हनुमान, मरी आई ,नाईकबा व मसोबा ही सर्व देवस्थाने आत्ताच्या ज्योतिर्लिंगाच्या मंदिरामध्ये सामावली आहेत. या मंदिरामध्येच गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने आनंदाने विविध सण साजरे करतात. श्रावण महिन्यात रुद्र अभिषेकाचे वाचन व सत्यनारायणाची पूजा करतात. घटस्थापना , नवरात्र उत्सव, विजयादशमी दसरा तसेच रथसप्तमीला कुंभार गावचे धोंडीराम कांबळे महाराज यांनी सुरू केलेला तुकाराम गाथा पारायण सोहळा सप्ताह साजरा केला जातो.