सोनवडे गावात पाटील,नांगरे, नाईक,पवार, खंडागळे,कदम,गायकवाड, जाधव, कडवेकर, घाटके,डवरी, बाबर, कांबळे, लोखंडे, बागडे,मुळे,भोसले, कुंभार,सुतार,गुरव, परांजपे, कुलकर्णी व यादव इत्यादी आडनावाची लोक असून कुंभार लोकांची वस्ती आहे त्यांच्या आडनावावरून त्या वस्तीला कुंभारवाडा म्हणतात, तर नाईक आडनावाची लोक राहतात त्या वस्तीला नाईक वाडा म्हणतात. या नाईकवाड्यात पंढरपूरचे महिन्याचे वारकरी म्हणून ओळख असणारे त्याकाळचे वारकरी सतू आज्या यांनी नाईकवाड्यात विठ्ठल रुक्माई चे मंदिर उभारले असून त्या मंदिरातच त्यांनी जीवंत समाधी घेतल्याचे सांगितले जाते.माघ महिन्यातील विजया स्मार्त एकादशी दिवशी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोनवडे गावात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करून सात दिवस वेगवेगळ्या महाराजांच्या कीर्तनातून समाज जागृतीचे काम केले जाते. आठव्या दिवशी भंडारा व सर्वांना आवडणाऱ्या खीर प्रसादाचे वाटप केले जाते. दुपारी जंगी कुस्त्यांचे आयोजन.केले.जाते.